वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली   

बीड : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याची प्रकृती खालावली आहे. कराडच्या रक्तातील साखर कमी झाल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 
 
कराड सध्या बीडच्या कारागृहात आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास त्याला अस्वस्थ वाटू लागले. अचानक प्रकृती बिघडल्यानंतर तुरूंग प्रशासनाने तातडीने डॉक्टरांना बोलावून घेतले. जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी कराडची वैद्यकीय तपासणी केली. त्याच्या रक्ताचेही नमूने घेण्यात आले. तपासणीदरम्यान त्याच्या रक्तातील साखर कमी झाल्याचे समोर आले. त्यानुुसार डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले.

Related Articles